खंडणीसाठी अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश; २४ तासांत गुन्हेगार गजाआड - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, July 6, 2025

खंडणीसाठी अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश; २४ तासांत गुन्हेगार गजाआड

पुणे :  दिनांक ३० जून २०२५ रोजी वडगाव शेरी परिसरातील कुबा मस्जिद जवळ एक इसम कामावर जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनंतर पीडित इसमाच्या पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार गु. र. क्र. २४६/२०२५, भारतीय दंड संहिता कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी माजलगाव, जि. बीड येथून तीन आरोपींना अटक केली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
१) गौतम केरुजी पोटभरे (३७), रा. राजेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड
२) अभिजीत वसंत पोटभरे (२७), व्यवसाय: शेती, रा. राजेवाडी, ता. माजलगाव
३) शुभम वसुदेव मायकर (२५), रा. मुकेंडे पिपरी, ता. वडवणी, जि. बीड
पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून अपहृत इसमाची सुखरूप सुटका केली असून, अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.
या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ चे श्री. सोमय मुंडे, तसेच सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभागाच्या श्रीमती प्रांजली सोनवणे यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, तपासी अधिकारी सहा. पो. निरीक्षक विकास बाबर, पोउपनि अजय असवले, पोलीस अंमलदार हसन मुलाणी, शिंदे व लहाने यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here