टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : बेट भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या टाकळी हाजी भागातील चांडोह येथील मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक शमीर इस्माईल हावलदार आणि जि.प.प्राथ.शाळा वसेवाडी (सणसवाडी) येथील शिक्षिका खतिजा इनामदार(हावलदार) या शिक्षक दापत्याने त्यांची मुलगी जोया हिच्या वाढदिवसानिमित्त होणार खर्च टाळून विद्यालयातील सर्व मुलींना वह्याचे वाटप करून तिचा वाढदिवस साजरा करत बेटी बचाव बेटी पढाओ असा संदेश दिला.
गेली अनेक वर्षापासून हवालदार आणि इनामदार हे जोडपे ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम शाळा, विद्यालयातून करत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी हे चांगल्या पदावर कार्यान्वीत आहेत. गरिबीची जाण शिक्षणात येणाऱ्या अडचणी गरिब परिस्थितीची जाणीव या त्यांनी जवळून अनुभव केल्या
आहेत. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता आपल्या मुलीला प्राधान्य देत मुलगी जोया हीचा वाढदिवस त्यांनी विद्यालयातील मुलींच्या सोबत साजरा केला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब रासकर, महेंद्र गायकवाड, अशोक गडीलकर,नवनाथ लाळगे ,संतोष नऱ्हे,बबन चोरे,कानसकर, प्रवीण कांदळकर,सुरेश गावडे, मारुती पळसकर, दादाभाऊ पानमंत यांच्या उपस्थित होते.






No comments:
Post a Comment